आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:मुंबईत कोरियन तरुणीचा विनयभंग, आरोपी अटकेत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईमध्ये एका कोरियन यूट्यूबर तरुणीचा विनयभंग करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन तरुण तिचा हात पकडून तिला बळजबरीने ओढून नेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. दक्षिण कोरियाची यूट्यूबर महिला मुंबईत रात्री फिरत होती. या वेळी खार भागात दोघांनी तिचा हात धरून विनयभंग केला. तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपींना पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे. मुबीन चाँद मोहंमद शेख आणि मोहंमद नकीब सदरियालम अन्सारी अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींनी याआधी कुणासोबत असा प्रकार केला का? याचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...