आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या Vs ठाकरे:कोर्लईतील 19 बंगले प्रकरण सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या कोर्लईतील 19 बंगल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी रात्री अटक केली आहे.

रेवदंडा पोलिसांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कोईर्लच्या तत्कालिन ​​​​​​सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवक अशा 6 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर कथित 19 बंगल्याची खोटी कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी मुरुडच्याग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर सहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 420, 465, 466, 468 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. ​​​​​​​

यांच्यावर झाला गुन्हा दाखल?

ग्राम विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या​​ तक्रारीनंतर रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावचे तत्कालिन सरपंच प्रशांत जानू मिसाळ ग्रामसेवक विनोद मिंडे यांच्यासह देवंगणा वेटकोळी, देविका म्हात्रे, गोविंद चंदर वाघमारे, रेश्मा रमेश मिसाळ, रेमा रमेश पिटकर आणि ​​​​​​​ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ​​​​​​यानंतर काल रात्री पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे.

नेमके काय आहे 19 बंगल्यांचे प्रकरण?

किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे, अन्वय नाईकांनी 2009 मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने 19 बंगले बांधले होते. त्यांनी दरवर्षी (2009, 2010, 2011, 2012, 2013) नियमीतपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरणा केली. 2014 मध्ये ठाकरे व वायकर परिवाराने अन्वय नाईकांकडून सदर जमिनी बंगल्यांसह स्वतःच्या नावे विकत घेतले.

ठाकरे परिवाराने या 19 बंगल्यांसाठी 2013 ते 2021 या 8 वर्षांची घरपट्टी भरली. 11 नोव्हेंबर 2020 रोजी घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ठाकरे सरकार, मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून या 19 बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकल्या.

रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर ही अटकेची पहिली कारवाई करण्यात आली आहे.