आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Koshyari's Controversial Statement:Send Koshyari Parcels Outside Maharashtra; His Intellectual Stature Is Low, His Controversial Statements Are Criticized

काळ्या टोपीखालचा मेंदू सडका:कोश्यारींचे पार्सल महाराष्ट्राबाहेर पाठवा; त्यांची बौद्धिक उंची कमी, वादग्रस्त वक्तव्यावर टीकेची झोड

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पार्सल महाराष्ट्राबाहेर पाठवा. त्यांची बौद्धिक उंची कमी आहे. त्यांनी उचलली जीभ आणि लावली टाळाला, अशा प्रतिक्रिया भगतसिंह कोश्यारींच्या ​​​​​शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर येत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.

काय म्हणाले कोश्यारी?

भगतसिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले की, आमच्या शाळेत तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे. आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!, असेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्राबाहेर पाठवा...

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी विनंती मी हात जोडून पंतप्रधानांना करतो. अशी व्यक्ती आम्हाला नकोय. जी महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवतायत. असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात..

बौद्धिक उंची नाही...

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.

वादग्रस्त बोलण्यात पटाईत...

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्यपालांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे.​​​ ते वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असे बोलण्याचे औदार्य दाखवले नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असे ते एकेरी बोलले, असा संताप मिटकरी यांनी व्यक्त केला.

पूर्णवेळ राज्यपाल द्या

राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी निषेध व्यक्त केला. तसेच महाराष्ट्राला पूर्णवेळ राज्यपाला द्यावा. कार्यकर्ता देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही करून नये, असा सल्ला दिला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यावर म्हणाले की, राज्यपाल महामहीम कोश्यारी यांची विधाने अशाच प्रकारची असतात. त्यांना पवार साहेब आणि गडकरी साहेब आज कळले असतील म्हणून त्यांनी हे विधान केले असेल.

सुधारायचे नाही ठरवलेले...

मनसे प्रवक्ते गजानन टाळे यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, राज्यपालांनी सुधारायचे नाही अस ठरवलेले दिसतेय. ज्या विषयातले कळत नाही तिथे का ज्ञान पाजळता ? गडकरीजी,पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा, पण छत्रपती शिवाजी महाराज, भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचे पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा.

राज्यपालांना बोलावून घ्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज औरंगाबादमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानांनी त्यांना परत बोलावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबादच्या कार्यकारिणीने केली आहे. जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी एक पत्र काढून तशी मागणी केलीय.

बातम्या आणखी आहेत...