आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती रेडकरचे नवे ट्विट:"पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’ या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा", रेस्तरॉ आणि बारचे 2 फोटो शेअर करत क्रांती रेडकरचा मलिकांवर हल्लाबोल

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने यांनी पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. क्रांतीने ट्विटवर दोन फोटो शेअर केले असून, त्यात समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्टॉरंट आणि बारचे फोटो आहेत. पहिल्या फोटोत क्रांतीने नवाब मलिकांनी ट्विट केलेल्याचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत क्रांतीने त्या बाबत माहिती दिली आहे. तसेच मलिकांवर 'फर्जीवाडा' म्हणत हल्लाबोल देखील करण्यात आला आहे.

क्रांती रेडकर म्हणाली की, “पहिल्या फोटोत मलिकांकडून बारचा दावा करण्यात आला. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’” या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा. जबाबदार पदावर बसून हे असे वागत आहेत. हे केवळ समीर वानखेडेंचे नाव खराब करण्यासाठी सुरू आहे.” असे म्हणत क्रांतीने मलिकांवर हल्लाबोल केला आहे.

बारबाबत काय आरोप?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्टॉरंटचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला होता. “समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” असे ट्विट करत मलिकांनी वानखेंडेवर पुन्हा एकदा नवीन खुलासा केला होता.

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे काय म्हणाले?
वानखेडे यांनी मलिकांच्या त्या आरोपानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे, आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे स्पष्ट केले आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आलेत.

वानखेडे म्हणाले की,“यात बेकायदेशीर असे काहीच नाही. मी सेवेमध्ये रुजू झालो तेव्हापासून म्हणजेच 2006 पासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वार्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे,” असे वानखेडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...