आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री क्रांती रेडेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या शूटवरील फोटो, व्हिडिओज नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता तिचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकरने केला आहे.
घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने गोरेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत मोलकरनीने चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. क्रांतीच्या तक्रारीच्या आधारावर गोरेगाव पोलिस तपास करत आहेत आणि त्या मोलकरणीला ज्या संस्थेने नोकरी दिली होती तिचा तपास सुरू आहे.
कोण आहेत क्रांती रेडेकर?
क्रांती रेडेकर यांचा 2017 साली क्रांती यांचा समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला होता. क्रांती आणि समीर यांना झिया आणि झायदा या दोन जु्ळ्या मुली आहेत. क्रांती रेडकर यांनी 2000 साली 'सून असावी अशी' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
2006 साली आलेल्या 'जत्रा- ह्याला गाड रे त्याला गाड' या चित्रपटात क्रांती यांची भूमिका होती. याच चित्रपटातल्या कोंबडी पळाली तंगडी धरून या गाण्याने क्रांती यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. तर काही वर्षांपूर्वी आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये क्रांती रेडकर यांचे नाव गोवण्यात आले होते. दुबईमधील एका हॉटेलमध्ये क्रांती रेडकर ही क्रिकेटपटू श्रीशांत सोबत सापडली असल्याचे या वृत्त वाहिनीने म्हटले होते. क्रांतीने हे आरोप फेटाळून लावले होते.
अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर सोमवारी मुंबईतील गोरेगाव परिसरात हल्ला झाला. या हल्ल्यात समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील दोन अधिकारी जखमी झाले आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.