आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन राकेश टीकैत यांची भेट घेतली. शिवसेनेने आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा याने हटके ट्विट केले आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने सोशल मीडियावर हटके पोस्ट टाकली. संजय राऊत आणि राकेश टिकैत यांच्या भेटीच्या फोटोखाली कामराने ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो जोडला आहे. यासोबतच या फोटोला 'मिले सूर मेरा तुम्हारा' असे कॅप्शन देत कुणालने फोटो शेअर केला आहे.
Mile sur mera tumhara... pic.twitter.com/siis8YMByV
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 2, 2021
कॉमेडियन कुणाल कामराचा 'शट अप या कुणाल' हा यूट्यूब शो प्रसिद्ध आहे. कोरोना काळामध्ये काही कारणांमुळे कुणालचा हा कार्यक्रम बंद झाला होता. तेव्हा त्याने संजय राऊत यांच्या मुलाखतीपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला होता. यासाठी कुणालने संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्या मुलाखतीवेळी कुणालने संजय राऊत यांना बुलडोझरची प्रतिकृती भेट म्हणून दिला होती.
अभिनेत्री कंगना रनोट हिने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर संजय राऊत आणि कंगनामध्ये वाक् युद्ध रंगले होते. यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. राज्यातील राजकारण तापले त्याच काळात कंगनाचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने थेट बुलडोझरने तिचे कार्यालय पाडण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन कुणाल कामरा याने संजय राऊतांना बुलडोझर म्हणून संबोधले आहे. तर राकेश टीकेत सध्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आंदोलन करत कृषी कायद्यांचा निषेध केला. यावरुन कामराने टीकैत यांना ट्रॅक्टर म्हणून संबोधले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.