आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कुंद्राला कोठडी:पोर्न प्रकरणात राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाने पोलिसांना म्हटले- चौकशी बस, आता नवीन पुरावे गोळा करा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्न फिल्म बनवणे आणि ऑनलाइन वितरित केल्याप्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, आता चौकशी पुरे नवीन पुरावे गोळा करा असे म्हणत कोर्टाने कुंद्राला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका आठवड्यापूर्वी झालेल्या चौकशीत पोलिसांनी राज कुंद्राच्या विरोधात काही पुरावे गोळा केले होते. परंतु, कुंद्रासोबत काम केलेल्या लोकांची त्याच्या समोरा-समोर बसवून त्याची चौकशी करणे अजुनही बाकी आहे. सोबतच, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर सुद्धा कुंद्राची चौकशी अजून झालेली नाही. पोलिसांनी कोर्टात मंगळवारी कुंद्राशी संबंधित काही बँक खात्यांची माहिती दिली. सुनावणी सुरू असताना न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे, कुंद्राची गेल्या 8 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. चौकशी पुरे झाली आता मुंबई पोलिसांनी आणखी पुरावे गोळा करावे.

केवळ कुंद्राच नव्हे, तर त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रयान थॉर्प याला सुद्धा 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, कुंद्राचा जबाब आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. तर दुसरीकडे, शर्लीन चोप्रा हिला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले.

राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तो सध्या भायखळा येथील तुरुंगात आहे. त्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या अटकेला आव्हान दिले होते. त्यावरही आज सुनावणी आहे. त्यातच कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पुन्हा चौकशी होणार अशी शक्यता आहे. पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने केलेल्या मागणीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचे तपशील सुद्धा दिले आहेत. लवकरच ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. शिल्पा शेट्टी आपल्या पतीच्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत होती. अशात शिल्पाची पुन्हा चौकशी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...