आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कामगार नेते दादा सामंत यांचे निधन, प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते

कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. बोरिवली (पूर्व) अभिनव नगर सोसायटीतील त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी तीन विवाहित कन्या गीता, नीता व रुता, जावई व नातवंडे असा परिवार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते. तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होते.

दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांच्या 16 जानेवारी 1997 साली झालेल्या निर्घृण हत्येनंतर 18 जानेवारी 1997 ते 9 मे 2011 पर्यंत ते कामगार आघाडीचे व संलग्न युनियनचे अध्यक्ष होते. 1981 च्या गिरणी संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील गिरणी मधील चांगली नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्या बरोबर युनियन मध्ये सक्रीय झाले. कामगार कायद्यावर त्यांचा चांगला अभ्यास होता.

बातम्या आणखी आहेत...