आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च शिक्षणाच्या अभावामुळे कोचिंग सेंटरमध्ये सफाई कामगाराची नोकरी करणारा युवा खेळाडू रिंकू सिंग आजच्या घडीला यंदाची आयपीएल गाजवत आहे. उत्तर प्रदेशच्या या २४ वर्षीय युवा फलंदाजाची गत उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाकडूनची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. त्याने सोमवारी सॅमसनच्या राजस्थान राॅयल्स संघाविरुद्ध २३ चेंडूंत त्याने सहा चाैकार व एक उत्तंुग षटकारसह नाबाद ४२ धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच कोलकाता संघाने ७ गड्यांनी विजयाची नोंद करता आली.
वडिलांसोबत सिलिंडरच्या डिलिव्हरीचे केले काम
उत्तर प्रदेशातील २४ वर्षीय रिंकूचा क्रिकेटमधील प्रवास हा खडतर राहिला आहे. शालेय शिक्षणातील अपयशानंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्याने मोठ्या जिद्दीने कामे करत क्रिकेटचा छंद अविरतपणे जाेपासला. इयत्ता नववीमध्ये नापास झाला. तो वडिलांसोबत गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीचे काम करू लागला. त्याला पाच भावंडे आहेत. मात्र, हे काम असताना त्याने क्रिकेटचेही प्रशिक्षण घेतले.
पंजाबकडून संधीचा अभाव; केकेआरने दाखवला विश्वास
रिंकू सिंगला २०१७ मध्ये आयपीएलसाठी पंजाब संघाने आपल्यासोबत करारबद्ध केले होते. यादरम्यान त्याला दहा लाख रुपये मिळाले होते. मात्र, त्याला या दरम्यान आयपीएलमध्ये पर्दापणाची संधीच मिळाली नाही. त्यानंतर तो कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत करारबद्ध झाला. कोलकाता संघाने या युवा खेळाडूवर विश्वास दर्शवला. त्याला संधी दिली. त्यानेही याच विश्वासाला सार्थकी लावताना वेळाेवेळी खास खेळी केली.
बाेलीतील रकमेतून बहिणीचे धडाक्यात लावले लग्न :
रिंकू सिंगला कोलकाता संघाने ८० लाखांत करारबद्ध केले होते. याच पैशातून त्याने आपल्या बहिणी आणि भावाची लग्नेही मोठ्या धडाक्यात लावली. यासह त्याने कुटुंबीयांच्या सेवेसाठी ही रक्कम खर्च केली.
फलंदाजीपाठाेपाठ क्षेत्ररक्षणातही तरबेज असल्याचे केले सिद्ध
रिंकू सिंगने फलंदाजीपाठाेपाठच क्षेत्ररक्षणाचाही दर्जा उंचावला. त्यामुळे तो दर्जेदार क्षेत्ररक्षक असल्याचे त्याने वेळाेवेळी सिद्ध केले. चार वर्षांच्या आयपीएल करिअरमध्ये त्याने आतापर्यंत १३ झेल घेतले आहेत. यंदाच्या सात झेलचा समावेश आहे. त्याने ३ सामन्यांत सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करताना हे यश संपादन केले आहे.
सुरेश रैनाकडून काैतुकाचा वर्षाव; रणजी ट्राॅफीतील कामगिरी सरस
रिंकूची रणजी ट्राॅफीमधील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळेच त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. तो आयपीएलमध्ये सहभागी होणारा अलीगडचा पहिला क्रिकेटपटू ठरला. यादरम्यान त्याने मोठ्या मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हा पल्ला गाठला. त्याच्यावर सुरेश रैनाने काैतुकाचा वर्षावही केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.