आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषणात अडथळा:दानवेंच्या भाषणात लाड यांचा खोडा; उपसभापतींनी खडसावले

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भाषण करत असताना मध्येच प्रसाद लाड (भाजप) बोलत होते. लाड सातत्याने दानवे यांच्या भाषणात अडथळा आणत असल्याचे पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे संतप्त झाल्या आणि त्यांनी लाड यांना फटकारून शांत राहण्याचे निर्देश दिले. दानवेंच्या भाषणावेळी लाड राज्यपालांचे अभिनंदन करण्यास सांगत होते.

यावर उपसभापतींनी हस्तक्षेप केला आणि लाड यांना सांगितले की, तुम्ही कुणालाही कुणाचेही अभिनंदन करायला भाग पाडू शकत नाही. मात्र, त्यानंतरही त्यांनी दानवे यांच्या भाषणात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे उपसभापती गोऱ्हे यांनी कडक शब्दांत सांगितले की, तुम्ही वारंवार त्यांचा भाषणात अडथळे निर्माण करू नका. कारण याचे उत्तर सरकार देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...