आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''देशाच्या राजकारणात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर संजय राऊत यांना अटक केली. आता त्यांना कळेल. संजय राऊतांचा गुन्हा काहीच नव्हता. मला जामीन मिळतात ते पळत हायकोर्टात गेले. मी भगवा घेऊन जन्माला आलो. या राज्यात परत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले आहेत.'' असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केला.
जेलमधून सुटल्यानंतर राऊत रात्री पावने अकराच्या सुमारास ते स्वगृही परतले. त्यापूर्वी परिसरात आयोजित शिवसैनिक आणि स्थानिक रहिवाशांना संबोधित करीत होते.
मी राजकीय सूडाचा बळी
'' संपूर्ण महाराष्ट्रात आज मुंबईतील माझ्या परिसरासारखाच उत्साह आहे. शंभर दिवसानंतरही लोक मला विसरले नाहीत. लोकांनी माझे स्मरण ठेवले आणि स्वागत केले. कोर्टाने ईडीला छापले हे मी बोलणार नाही, पण मी जे सांगत होतो की, मला चुकीच्या पद्धतीने अटक केली. मी निर्दोष आहे. हे आम्ही वारंवार सांगत होतो. मी राजकीय सूडाचा बळी ठरलो, पण मी माघार घेतली नाही. यापुढेही मी लढत राहील महाराष्ट्रात एकच शिवसेना आहे आणि तीच उद्धव ठाकरेंचीच राहील. शेवटी सत्य जिंकले.''
बोके खोक्यावर बसले
राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे बोके खोक्यावर बसले आहेत. गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा काहीच अधिकार नाही. मुंबई शिवसेनेकडून हिसकावण्यासाठी हा कट शिजला आहे. मला अटक त्यासाठीच झाली. हीच खरी शिवसेना आहे जिने आज माझ्यासारख्या शिवसैनिकांना सन्मान दिला. लोक मला नव्हे तर शिवसेनेला अभिनंदन करीत होता.
माझे नव्हे भगव्याचे स्वागत झाले
राऊत म्हणाले, रस्त्यावर उतरुन मुस्लिम समाज माझे अभिनंदन करीत होती. मला पुन्हा पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होत आहे. किशोरी पेडणेकर असो, भास्कर जाधव असो शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. हे स्वागत माझे नव्हे तर शिवसेनेचे आणि भगव्या झेंड्याचे आहे.
मला संपवणे सोपे काम नाही
राऊत म्हणाले, मला संपवणे सोपे काम नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही अंगार आहे. माझ्या कुटुंबाला आधार देणाऱ्याचे धन्यवाद. मी 103 दिवस तुरुंगात राहीलो आता 103 आमदार निवडून आणू. मी तुरुंगात राहीलो पण प्रत्येक शिवसैनिक माझ्या जेलमधून सुटण्याची वाट बघत होते.
आता सुसाट सुटायचेय
राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेना फोडली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण गोठवण्याचा प्रयत्न केला, चालू आहे. त्यांच्या छाताडावर बसू. आकाशाला गवसणी घालून आपण तीच ताकद परत आणू, आता मी सुटलो आता सुसाट सुटायचेय.
महाराष्ट्रात एकच शिवसेना
संजय राऊत म्हणाले, शिवसेना एकच आहे, गट वैगेरे काही नाही. बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्यांसाठी सन्मान मिळतो. शिवसेनेवर अनेक प्रहार झाले पण ती खचली नाही. मी शिवसैनिक आहे. पक्षासाठी मरायलाही तयार आहे. ज्या पक्षात जगलो त्याच शिवसेनेत मी मरेल अशी भूमिका संजय राऊत यांनी आज दिली. जेलमधून सुटल्यानंतर त्यांनी थेट शिंदे गटालाही आपल्या खास शैलीत सुनावले.
जेलमध्ये राहणे चांगली गोष्ट नाही
संजय राऊत म्हणाले, माझ्यासारख्या व्यक्तीला केंद्रीय तपास यंत्रणा अटक करते. मी कायदेशीर लढाई लढलो. आता कोर्टाचे निरीक्षण समोर आले आहे. आम्ही आमच्या जीवनात कधीही चुकीचे काम केले नाही. एकमेकांशी राजकीय मतभेद असतात, ते होत राहतीलही लोकशाही आहे. पण मी शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस कारागृहात राहीलो हे मी विसरणार नाही.
जेलमध्ये का पाठवले?
राऊत म्हणाले, मला देशाच्या न्यायव्यवस्थेने न्याय दिला आणि मी न्याय व्यवस्थेचा आभारी आहे. मी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. तुरुंग हा तुरुंगच असतो. तो ऑर्थर रोड असो की अंदमान. मला जेलमध्ये का पाठवले हे मला अद्याप माहीत नाही.
मी न्यायालयाचा आभारी
राऊत म्हणाले, चाळीस वर्षे मी पत्रकारितेत आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात तीस वर्षांपासून आहे. जवळजवळ मी चार वेळा खासदार झालो आहे, अशा व्यक्तीला आपण तुरुंगात ढकलता का? मी न्यायालयाचा आभारी आहे.
जिथे जगलो तिथेच मरणार
राऊत म्हणाले, ज्या पक्षात मी जगलो त्याच पक्षात मी मरणार आहे. शंभर दिवस जेलमध्ये राहणे काही चांगली गोष्ट नाही. जेलमध्ये राहणे कठीण असते. तरीही मी जेलमध्ये शंभर दिवस राहीलो. शिवसेना एकच आहे. गटवगैरे काही नाही. बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्यांसाठी सन्मान मिळतो.
पळणाऱ्याला पळू द्या
संजय राऊत म्हणाले, आमचा आत्मा शिवतीर्थावर आहे. मी बाळासाहेबांच्या दर्शनाला जाणार मी शिवसैनिक आहे. शिवसेनेवर अनेक प्रहार झाले पण शिवसेना खचली नाही. पळणाऱ्यांना पळू द्या. मरण पत्करेन पण मी शिवसेना सोडणार नाही. मी मागे हटणार नाही. मी लढणार आहे. मला अटक झाली तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात दुःखाश्रू होते. आता तिला आनंद होईल.
जेलमध्ये राहणे कठीण
राऊत म्हणाले, ज्या पक्षात मी जगलो त्याच पक्षात मी मरणार आहे. शंभर दिवस जेलमध्ये राहणे काही चांगली गोष्ट नाही. जेलमध्ये राहणे कठीण असते. तरीही मी जेलमध्ये शंभर दिवस राहीलो. शिवसेना एकच आहे. गटवगैरे काही नाही. बाळासाहेब ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्यांसाठी सन्मान मिळतो.
भावाने कुटुंब सावरले
राऊत म्हणाले, मी शिवसैनिक आहे. पक्षासाठी मरायलाही तयार आहे. माझ्या कुटुंबावर जास्त जबाबदारी माझ्या जेलमध्ये गेल्यानंतर होती. भावाने सर्व सांभाळले. मला सुटका झाली माझ्या आईसारख्याच महाराष्ट्रातील अनेक आई मला अटक झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते.
आवाज ऐकण्यासाठी ठाकरे आतूर
राऊत म्हणाले, देशात घटना आणि कायदा जीवंत आहे. मी सुटल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. माझा आवाज ऐकण्याची ते वाट पाहत होते ते आतूर होते. आता मी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.