आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी दीपिका पदुकोन, आलिया भट, ऐश्वर्या रॉय, शिल्पा शेट्टी, सोनम कपूरसह तब्बल 98 सेलेब्रिटींच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड करून एका टोळीने बँकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॉलिवूड हादरले असून, बँकांनी डोक्याला हात लावलाय. आता हे पैसे वसूल करायचे कसे, या चिंतेमुळे बँक व्यवस्थापकांची भंबेरी उडालीय.
प्रथमदर्शनी हा फ्रॉड 90 लाखांच्या घरात आहे. मात्र, या टोळीने आणखी कोणा-कोणाला असे फसवले, हे तपासात समोर येईल. याप्रकरणी पुण्यातील मेसर्स एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने सायबर शाखेकडे तक्रार केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून...
भामट्यांनी दीपिका पदुकोन, आलिया भट, ऐश्वर्या रॉय, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, एम. एस. धोनी, अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, हृतिक रोशन या सेलिब्रेटींची बनावट कागदपत्रे तयार केली. पनकार्ड, आधार कार्डच्या बनावट कॉपी बनवल्या. या कागदपत्रांच्या आधारे क्रेडिट कार्ड घेतले. त्या क्रेडिट कार्डवर लाखो रुपयांचे कर्ज उकळले. मात्र, याचे हफ्ते काही भरले जात नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.
पाच जणांना अटक
पुण्याच्या मेसर्स एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भामट्यांनी 21 लाख 31 हजारांचा गंडा घातला. या कंपनीचे प्रतिनिधी शेखावत यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याचे समोर आले आहे.
उच्चविद्याभूषित आरोपी
पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी एकाने बीटेकचे शिक्षण घेतलेले आहे. या टोळीकडून पाच चेकबुक, 42 सिमकार्ड, 40 क्रेडिट कार्ड, 34 बनावट कार्ड, 25 पेक्षा जास्त आधार कार्ड जप्त केलेत. या टोळक्याने अजून कोणा-कोणाला गंडा घातला आहे, या फसणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.