आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:ऑनलाइन घ्या लालबागच्या राजाच्या मोहक रूपाचे प्रथम दर्शन; नेता असो किंवा अभिनेता, गर्दी होऊ देणार नसल्याचे नांगरे पाटलांनी केले स्पष्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नागरिकांना ठणवकावले आहे.

राज्यभरातील घराघरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचा धोका पाहता कलम 144 लागू करण्यात आली आहे. प्रसिद्ध लालबागचा राजा येथे देखील गर्दी होऊन नये याची खबरदारी घेतली जात आहे. यावेळी मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी नागरिकांना ठणवकावले आहे. नेता असो किंवा अभिनेता, देणे घेणे नाही, गर्दी होऊ देणार नाही असे ते म्हणाले आहेत.

गणेश दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीविषयी बोलताना नागरे पाटील म्हणाले की, नेता असो किंवा अभिनेता गर्दी होऊ देणार नाही. लालबागच्या राजा गणेशोत्सवह मंडळासोबत त्यांनी चर्चा केली. पोलिसांनी आधी लालबाग परिसरातील दुकाने बंद केली होती. त्यामुळे स्थानिकांकडून विरोध करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा करुन मध्यस्थीचा मार्ग काढला. त्यानंतर दुकाने सुरु करण्यात आली.

भक्तांच्या ऑनलाईन दर्शनाची सोय
दरवर्षी दहा दिवस गणपतीचा उत्साह जोमात असतो. पुतळाबाई चाळीतील 'लालबागचा राजा' हा मुंबईमधील अत्यंत प्रसिद्ध असा गणपती आहे. येथे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त गर्दी करत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून गर्दी टाळली जात आहे. यंदा देखील गर्दी टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. यामुळे यंदाही शासन निर्णयानुसारच गणेशोत्सव साजरा होणार असल्याची घोषणा 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'कडून करण्यात आली आहे. यामुळेच गर्दी टाळण्याच्या उद्देशाने मंडळाने गणेश भक्तांसाठी घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...