आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव:लालबागचा राजा आरोग्योत्सवाचे आज शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, मंडळातर्फे प्लाझ्मादान शिबिराचे करण्यात येणार आयोजन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लाझ्मादानासाठी 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार

राज्यातील कोरोना संकट पाहता प्रसिद्ध लालबाग राज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आजपासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. 86 वर्षांत पहिल्यांदाच लालबाग राजाच्या गणेशोत्सव होणार नाही

मंडळाने के.ईएम रुग्णालयाच्या संयुक्ताने प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली आहे. यासाठी 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासोबत गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार. तसेच कोरोनाशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 1 लाख, शौर्यचिन्ह देण्यात येणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.