आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO लालबागच्या राजाला थाटामाटात निरोप:गिरगाव चौपाटीवर पुष्पवृष्टी, कोरोनाच्या 2 वर्षांनंतर जल्लोषात उत्सव

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंत चतुर्दशीनिमित्त देशभरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबईतील बहुचर्चित लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीचे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविक हजारोंच्या संख्येने जमा झाले होते. यावेळी गेले 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करणाऱ्या भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

मुंबईतील गणेशोत्सवाबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांनी सांगितले की, कोरोनाच्या दोन वर्षानंतर लोक हा सण उत्साहात साजरा करत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत यंदा लोकांची मोठी गर्दी झाली. विसर्जनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांचे 19 हजार जवान शहरात तैनात करण्यात आले होते.

पाहा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे फोटोज...

10 दिवसांनंतर लालबागच्या राजाला भव्य निरोप देण्यात आला. मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते.
10 दिवसांनंतर लालबागच्या राजाला भव्य निरोप देण्यात आला. मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...