आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे लालबागच्या राजाची मूर्ती स्थापित होते, तेथून थोड्याच अंतरावर एक कंटेनमेंट झोन आहे. 86 वर्षांत पहिल्यांदाच लालबाग राजाच्या गणेशोत्सव होणार नाही. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा खंडीत करण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते.
अशात कमिटीच्या 1200 सदस्यांनी बैठक घेतली. कोरोनामुळे झूप अॅपवर झालेली ही बैठक सुमारे 3 तास चालली. 'देश हाच देव' या एकाच गोष्टीवर बैठकीतील सर्व सदस्यांचे एकमत होते. चर्चेनंतर यंदाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला.
दररोज लाखो लोक 'लालबागच्या राजाचे' दर्शन घेतात
गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अमिताभ बच्चन देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. मुंबईच्या या सर्वात प्रसिद्ध गणपतीबद्दलच्या लोकांच्या श्रद्धेमुळेच याची विसर्जन मिरवणुक सकाळी सुरू होते आणि विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे 19 तास लागतात. या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होतात.
रात्री 9 वाजता सुरू झालेली बैठक 12 वाजेपर्यंत चालली
86 वर्षांपासून सुरू असलेल्या 'लालबागचा राजा' गणेशोत्सवाची परंपरा स्थगित करण्याचा निर्णय घेणे या गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांसाठी सोपे नव्हते. मंडळाचे सचिव सुधीर साळवी सांगतात की, मंगळवारी बैठक झाली. यामध्ये 1200 सदस्य सहभागी झाले होते. झूम अॅपवर सुरू झालेली बैठक रात्री 9 वाजता सुरू झाली आणि 12 वाजेपर्यंत चालली. 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाची स्थापना होणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या वेळी गणेशोत्सवाच्या ऐवजी 'आरोग्योत्सव'
मंडळाचे सचिव सुधीर दळवी म्हणतात, आम्ही देशालाच देव मानतो. मुंबईसह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे आम्ही येथे येणारे भाविक, पोलिस कर्मचारी आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास महत्त्व दिले आहे. लालबागच्या राजावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये आहे. जर आपण मूर्ती स्थापित केली तर मोठ्या संख्येने भाविक येतील. याद्वारे संसर्ग पसरण्याची भीती आहे. म्हणून आम्ही या वेळी मूर्तीची स्थापना करणार नाही. आम्ही या वेळी आरोग्यत्सवाच्या रुपात गणेशोत्सव साजरा करू.
केईएम रुग्णालयाच्या संयुक्ताने आयोजित करणार प्लाझ्मा डोनेशन शिबिर
साळवी म्हणाले की, यावेळी केईएम रुग्णालयासमवेत आरोग्योत्सव साजरा करू. यादरम्यान प्लाझ्मा डोनेशन कॅप्म आयोजित करणार आहोत. प्लाझ्मा दान करण्यासाठी येणार्या व्यक्तीची तपासणी केली जाईल आणि त्याचा डेटा तयार केला जाईल.
यावेळी गलवान घाटीत चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार असल्याचे साळवी यांनी सांगितले. याशिवाय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मंडळाकडून 25 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांकडे दिला जाईल.
यामुळे विशेष आहे लालबागचा राजा
लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी सारखीच राहते. फक्त थीम बदलली जाते. मूर्ती बनवण्यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो. मूर्तीची उंची जवळपास 12 फूट असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.