आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस:एल अँड टी-सुफिन, बी२बी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवांमध्ये कार्यरत असलेल्या लार्सन अँड टुब्राे या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने बीटूबी औद्योगिक उत्पादने आणि सेवांसाठी एल अँड टी सुफिन हा एकात्मिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच करण्याची घोषणा केली आहे.

८० वर्षांपेक्षा जास्त काळातील आपल्या अफाट अनुभवावर आधारित एल अँड टी या बीटूबी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायांना, विशेषत: एमएसएमईला सशक्त बनवण्यास सज्ज आहे, जेणेकरून ते संपूर्ण देशात त्यांचा औद्योगिक पुरवठा डिजिटल आणि किफायतशीरपणे करू शकतील. एल अँड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रमण्यम म्हणाले, “भारताची ५ ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था बनण्याची आकांक्षा असल्याने, भारतीय उद्योगांची, विशेषत: लहान आणि मध्यम जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी पुरवठा साखळी डिजिटल करण्याची गरज आहे. एल अँड टी सुफिन लाँच करून, आम्ही वेगाने डिजिटल परिवर्तनाकडे वाटचाल करत आहोत. यामुळे औद्योगिक उत्पादनांसाठी बीटूबी बाजारपेठेचा कायापालट करेल. टियर-१ आणि टियर-२ शहरांमधील आणि बाहेरील ग्राहकांसाठी ते सहज उपलब्ध, सोयीस्कर आणि पारदर्शक बनवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...