आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन संकुल:हायकोर्ट इमारत उभारणीसाठी वांद्रे येथे जागा देणार ; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आश्वासन

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी मुंबईतील वांद्रे येथील जागा राज्य सरकार लवकरच देईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमचे सरकार कायद्याच्या अंमलबजावणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने काम करीत असून मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुलभतेने व्हावे यासाठी वांद्रे येथे नवीन न्यायालयीन संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी भूखंड देण्याबाबत मुख्य न्या.दीपंकर दत्ता यांना अनेक दिवसांपासून वाटत असलेली चिंता जवळपास दूर झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हा सन्मान विठ्ठलाच्या पूजेसारखा : न्या : लळीत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्यायप्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ, असे त्यांनी सांगितले. लळीत यांनी आपली कर्मभूमी सुप्रीम कोर्टात असली तरीही जी कामे हाती घेतली, त्यात राज्याशी संबंधित अधिक कामे होती, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...