आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार:भारतरत्न लता मंगेशकर यांची राज्याला मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले 7 लाख

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून सात लाखांची मदत करण्यात आली आहे. या मदतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. राज्य सध्या कोरोना लाटेच्या विळख्यात असताना राज्यासाठी अनेकांकडून मदत केली जात आहे.

राज्यातील कोरोना युद्धामध्ये सामान्यांसह सर्वांना मदत करता यावी यासाठी महाराष्ट्रात सरकारने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी निर्माण केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी कोविड 19 साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तुम्हीही करू शकता मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

बातम्या आणखी आहेत...