आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप लेक, गानसम्राज्ञीच्या अंत्यविधीला:प्रत्येक बापाला लेक का असावी, लेक असलेला बाप भाग्यवान कसा असतो ते यावरून दिसते

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे याना अंत्यदर्शनावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे याना अंत्यदर्शनावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्यदलाकडून यावेळी दीदींना मानवंदना देण्यात आली. यावेळी शिवाजी पार्कात लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवाजी पार्कवर खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे वडील शरद पवार यांच्यात घडलेला विशेष प्रसंग प्रत्येक बापाला लेक का असावी हे सांगून जातो.

शिवतीर्थावर काय घडले...
खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्र लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर पोहोचले होते. सर्वात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतले. त्यानंतर ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार आपल्या पायातील बूट खाली काढून अंत्यदर्शन घेण्यासाठी गेले. त्यानंतर ते आपल्या स्थानावर येऊन बसले असताना आपल्या वडिलांची मदत करण्यासाठी कसलाही विचार न करता सुप्रिया सुळे वडिलांच्या पायात बूट घालण्यासाठी लगेचच पुढे सरसावल्या.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना एका खूर्चीवर बसवले आणि आपण स्वतः गुडघ्यावर बसून त्यांनी वडिलांच्या पायात बूट घातले. खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचलले, ते कौतुकास्पद होते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...