आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या बऱ्या होत असल्याचे त्यांची भाची रचना शाह यांनी सांगितले. सध्या लता मंगेशकर यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रचना शाह यांनी एका न्यूज वेबसाईटशी बोलताना सांगितले की, 'सध्या त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळामुळे त्यांना अनेक समस्या आहेत, त्यामुळे डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत. त्या पुढील काही दिवस अजून रुग्णालयात दाखल राहतील.'
कोरोनावर विजय मिळवून त्या लवकरच घरी परत येतील
रचना शाह पुढे म्हणाल्या की, 'देव खरोखरच दयाळू आहे. तो एक सेनानी आणि विजेता आहे आणि अशाच प्रकारे आम्ही त्यांना इतक्या वर्षांपासून ओळखतो. मी देशभरातील सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी देवाला प्रार्थना केली. आपण पाहू शकतो की जेव्हा प्रत्येकजण प्रार्थना करतो तेव्हा काहीही चुकीचे होऊ शकत नाही. आम्हाला पूर्ण आशा आहे की कोरोनाचा पराभव करुन दीदी लवकरच घरी परत येतील.'
10-12 दिवस आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समधानी यांनीही नुकतेच एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, लता दीदींसाठी सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली असून तेच त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्या बऱ्या होत असल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू दिले जात नाही. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही त्रास आहे. त्यामुळे आता त्यांना 10-12 दिवस आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. प्रतिक गेल्या काही वर्षांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. 92 वर्षीय गानकोकिळा यांना दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या 28 दिवस रुग्णालयात दाखल होत्या.
p
आम्ही दीदींना भेटायला जाऊ शकत नाही: उषा मंगेशकर
यापूर्वी लता मंगेशकर यांची धाकटी बहीण उषा मंगेशकर म्हणाल्या होती, 'दीदींना कोरोना झाला असल्याने आम्ही त्यांना भेटायला जाऊ शकत नाही. मात्र तेथे पुरेसे डॉक्टर आणि परिचारिका आहेत.
घरातील कर्मचाऱ्यांमुळे लता मंगेशकर यांना कोरोना झाला
लता मंगेशकर यांच्या 'एलएम म्युझिक' या म्युझिक लेबलचे सीईओ मयुरेश पै यांनी दैनिक भास्करशी केलेल्या खास संवादात सांगितले की, "लता दीदींची तब्येत सध्या ठीक आहे आणि डॉक्टर त्यांना काही दिवस निरीक्षणाखाली ठेवतील. त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल. त्यांना शनिवारी आणि रविवार दरम्यान मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. लतादीदींशिवाय त्यांची बहीण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह कुटुंबातील कोणालाही कोरोना झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मुंबईतील पॅडर रोडवरील घरात लता कुटुंबासह राहतात.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर लताजी 2019 पासून घराबाहेर पडल्या नाहीत. कोणालाही भेटल्या नाहीत, तर मग त्यांना कोरोना कसा झाला? या प्रश्नावर पै म्हणाले, 'घरात काम करणारे कर्मचारी सामान आणण्यासाठी बाहेर येत-जातात. कर्मचार्यांपैकी फक्त एकाला संसर्ग झाला होता. लता दीदी त्यांच्या संपर्कात आल्या होत्या, त्यामुळे त्यांची कोविड चाचणी करण्यात आली, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.