आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांच्या घरात कोरोनाची एंट्री:पत्नी, मुलीसह चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, सौम्य लक्षणे असल्याने सर्व घरीच क्वारंटाइन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या आई, पत्नी आणि मुलीसह चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

राऊत यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे होते. यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सौम्य लक्षणे होते. यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील अनेकांना नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा देखील समावेश आहे. जवळपास 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...