आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये 120 वंदे भारत गाड्या जलदरित्या निर्मितीची योजना:रेल पॅनेल सदस्य शामसुंदर मानधना यांची माहिती

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या मुख्य भागासह 200 प्रगत वंदे भारत गाड्या बनविण्याच्या योजनेने निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी सर्वात कमी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात कमी बोलीदारांची 58000 कोटींची टेंडरची निवड करण्यात आली आहे, अशी माहीती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

चेन्नई - लातूरमध्ये निर्मिती

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना म्हणाले की, यापैकी 120 रेक किंवा एकूण 1920 कोच लातूरमध्ये आणि बाकीचे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत बनवले जातील.

बोली लावणाऱ्यांत या कंपन्या

मानधना म्हणाले की, लातूरचे लोकसभेचे खासदार सुधाकर श्रांगारे हे या अत्याधुनिक 16 डब्यांच्या रेकचे काम लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. रेल्वे मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की रशियाच्या CJSC ट्रान्समॅशहोल्डिंग आणि भारतीय PSU रेल विकास निगम लिमिटेडचा एक संघ सर्वात कमी बोली लावणारा होता, त्यानंतर सरकारी-भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि खाजगी रेक उत्पादक टिटागढ वॅगन्सचा क्रमांक लागतो.

गाड्यांच्या वितरणासाठी आगाऊ देयके

प्रकल्पासाठी राखून ठेवलेल्या 58000 कोटींपैकी 26,000 कोटी रु. गाड्यांच्या वितरणासाठी आगाऊ देयक असतील, तर रु. 32,000 कोटी रु. 35 वर्षांच्या कालावधीत गाड्यांच्या देखभालीसाठी दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...