आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटेल, होलसेल रूपात ‘ई रुपी’ अखेर लाँच:रिझर्व्ह बँकेचा पथदर्शी प्रकल्प, देशातील पहिल्या डिजिटल करन्सीची सुरुवात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंगळवारी देशाच्या पहिल्या डिजिटल करन्सीची सुरुवात केली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून आरबीआयने डिजिटल करन्सी सीबीडीसी होलसेल जारी केली आहे. यासाठी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट व एचएसबीसी बँकेची निवड करण्यात आली आहे.

दोन प्रकारचे असेल डिजिटल चलन : डिजिटल चलन दोन प्रकारचे असेल. होलसेल व रिटेल. १ नोव्हेंबरपासून सुरू होणारे डिजिटल चलन सीडीबीसी होलसेल आहे. जगभरातील ६० केंद्रीय बँकांनी यात आपले स्वारस्य दाखवले आहे.

{ ई-रुपीचा फायदा काय? ई-रुपीमुळे नेमका पैसा कोणत्या क्षेत्रात आहे याची माहिती सरकारला सहज उपलब्ध होईल. आर्थिक व्यवहारासाठी लागणारा खर्चही कमी होणार आहे. नोटांच्या छपाईवर होणारा खर्च वाचेल. व्यावसायिक बँकांवर असलेले अवलंबित्व या माध्यमातून कमी होईल. { ई-रुपी कसे मिळवता येईल? यासाठी आरबीआय लवकरच मोबाइल अॅप सुरू करत आहे. { मी डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करतो. यात आणि ई-रुपीमध्ये काय फरक आहे? ई-रुपी डिजिटल टोकनच्या स्वरूपात मिळेल. शिवाय ते रोख चलनाच्या स्वरूपात वापरता येईल. आरबीआय नोटांच्या मूल्यावर जी हमी देते ती ई-रुपीवरही असेल. { खात्यावरील रक्कम मी ई-रुपीमध्ये बदलू शकेन? होय, बँकांतून तुम्ही नोटांच्या बदल्यात ई-रुपीही घेऊ शकता. { ई-रुपीचा उपयोग नेमका कोणत्या वर्गासाठी अधिक आहे? सामान्य नागरिक अगदी कमीत-कमी रकमेचेही व्यवहार करू याद्वारे शकतील. मोठी उलढाल असलेल्या व्यावसायिक, संस्थांना याचा अधिक उपयोग होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...