आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ:राज्यात 12 बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक; 90 हजार रोजगार

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुंतवणुकदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार; मुख्यमंत्री

डेटा सेंटर, मॅन्युफॅक्चरींग, फूड प्रोसेसिंग, अॅाटोमोबाईल्स क्षेत्रातील १२ बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात लवकरच १६ हजार कोटींची गुंतवणुक करणार आहेत. या मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्यात ९० हजार रोजगार निर्माण होण्याची आशा उद्योग विभागाला आहे. लाॅकडाऊनमुळे ठप्प झालेल्या रोजगारांना या गुंतवणुकीमुळे चालना मिळणार आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य कराराने सोमवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र मधील दुसऱ्या टप्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विविध देशांचे वाणिज्यदूत आणि गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी १२ कंपन्यांशी ठाकरे सरकारने १६ हजार कोटींचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले.

कोराेनामुळे अर्थ चक्र थंडावले होते, त्याला या गुंतवणुक करारामुळे गती मिळणार आहे. गुंतवणुकदारांना कोणतीही अडचणी येणार नाहीत, महाराष्ट्रावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली.

४० हजार हेक्टर जमीन राखीव : सामंजस्य करार १६ हजार ३० कोटींचे होते. यामधून थेट १३ हजार ४४२ नव्या रोजगारांसह एकूण ९० हजार रोजगार निर्मितीची आशा आहे. निर्माण होणार आहेत, या उद्योगांसाठी राज्यात चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. तसेच ४८ तासांत परवाना दिला जाणार आहे. त्याबरोबरच राज्यात औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे.

गुंतवणूकदार कंपन्यांना उद्योग मित्राचा दर्जा

हे करार दाखवण्यापुरते नाहीत, तर प्रत्यक्ष गुंतवणुक येणारे आहेत. या कंपन्यांना आम्ही उद्योग मित्राचा दर्जा दिला आहे, आजचे करार म्हणजे महाराष्ट्र पुन्हा उभारी घेतोय याचे सुचिन्ह आहे, असे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

नगरमध्ये ८२० कोटींचा प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे हेंगली कंपनी २५० कोटी, असेंडास कंपनी ५६० कोटी, वाॅल मोर्टस ३७७० कोटी गुंतवणूक करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात वरुण बेव्हरिज ८२० कोटींची तर ठाणे येथील महापे येथे हिरानंदानी ग्रुप १५० कोटीची गुंतवणूक करणार आहे. रांजणगाव येथे इस्टेक कंपनी १२० कोटी आणि हिंजवडी येथे रॅकबँक कंपनी १५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात अत्यल्प गुंतवणूक

भाजपच्या फडणवीस सरकारच्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रम पहिल्यांदा हाती घेतला होता. मात्र त्याअंतर्गत सामंजस्य करार झाले त्यातील अत्यल्प गुंतवणूक प्रत्यक्षात झाली, असा विरोधकांनी आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...