आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य पुरस्कार विजेत्या लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संबंधित घटना रविवारी घडली. वाढलेला मेंटेनन्स आणि घरात केलेल्या अंतर्गत कामाच्या वादातून विजया पालव यांना मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्याच्यानंतर विजया पालव यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने उपचारासाठी पाठवले.
दरम्यान पोलिसांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार विजया पालव ज्या सोसासटी मध्ये राहतात तेथील रहिवासांकडून मेंटेनन्स जमा करण्याचं काम बिल्डर करतो. मात्र संबंधित सोसायटीचा मेंटेनन्स 800 रुपये होता. पण बिल्डरने मेंटेनन्सच्या रकमेत दुप्पट वाढ केली. त्याने 800 रुपयांवरून थेट 1500 रुपये केला होता. यामुळे वाढलेल्या मेंटेनन्समुळे संबंधित सोसायटीत राहणारे रहिवासी बिल्डरवर संतापले होते. अशातच मेंटेनन्सच्या रकमेत जास्त वाढ केल्याने विजया पालव आपल्या काही महिला साथीदारांसह जाब विचारण्यासाठी संबंधित बिल्डरकडे गेल्या होत्या.
यावेळी बिल्डरसोबत वाद झाल्यानंतर, 'तुम्ही घरातील अंतर्गत काम कोणाला विचारून केलं?' असा उलट प्रश्न बिल्डरने पालव यांना विचारला. यानंतर झालेल्या वादावादीनंतर बिल्डरच्या गटातील काही महिला आणि पालव यांच्यासोबत गेलेल्या काही महिलांमध्ये हाणामारी झाली. या मारहाणीत लावणीसम्राज्ञी विजया पालव जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.