आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्यासाठी कायदा दुरुस्ती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान टाळता यावे आणि राज्यपालांच्या परवानगीची गरज भासू नये. यासाठी ही निवड आवाजी मतदानाने करता यावी म्हणून कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यानंतरच अध्यक्षांची निवड करावी, असेही ठरले आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘दिव्य मराठी’ला गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अध्यक्षांची निवड करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सध्या राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते. कारण ही निवड गुप्त मतदान करून केली जाते. केवळ महाराष्ट्रातच ही तरतूद आहे. म्हणून कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आमदारांची उपस्थिती लक्षात घेऊन शक्यतो येत्या अधिवेशनातच ही दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवड करण्यात येईल. या निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी कोण उमेदवार असेल ते जाहीर करतील.

विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय राहुल गांधी घेतील
विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण उमेदवार असू शकेल या प्रश्नावर पटोले म्हणाले, पक्षश्रेष्ठींकडे सर्व आमदारांची माहिती, कामाचा लेखाजोखा आणि क्षमता यांची नोंद असते. त्यावरून तेच उमेदवार जाहीर करतात. त्यांना मंत्रिमंडळातील कोणाला हे पद द्यावे असे वाटले तर ज्येष्ठ मंत्र्यांची निवड होऊ शकते आणि मंत्रिमंडळाच्या बाहेरच्या व्यक्तीची निवड करायची असेल तर प. महाराष्ट्र, मराठवाडा किंवा मुंबईतील कोणाची निवड होऊ शकते. तो निर्णय स्वतः राहुल गांधी घेतील.

बातम्या आणखी आहेत...