आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:आघाडी सरकार संकटात; काँग्रेसला चिंता मंत्रिमंडळ बदलात पदरात काय पडणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबाॅम्बमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात आहे. मात्र सरकारमधील एक घटक पक्ष असलेली काँग्रेस एप्रिलमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खांदेपालटात आपल्या पदरात अधिकचे काय पडणार, याच्या चिंतेत आहे. तसा सूर मंगळवारी सायंकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी झालेल्या काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत निघाला.

गृहमंत्री देशमुख यांच्यावरील आरोपप्रकरणी जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या. कारण निर्णयाला विलंब केला गेल्याने आघाडी सरकारची मोठी बदनामी होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय बैठकीत झाला. एप्रिलमध्ये मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात. वनमंत्रिपदाचा कारभार सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यामध्येही बदल होऊ शकतो. या बदलावेळी काँग्रेसची आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली पाहिजे, अशी भूमिका काही मंत्र्यांनी बैठकीत मांडली. रा.स्व.संघाशी घनिष्ठ असलेले ज्येष्ठ अधिकारी यांच्यावर प्रशासकीय गैरवर्तुणकीबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. कारण या अधिकाऱ्यांना सरकारचे भय नाही. परिणामी, सरकारला ते सातत्याने अडचणीत आणत आहेत, अशी तक्रार काही मंत्र्यांनी केली.

राष्ट्रवादीमुळेच बदनामी
राज्यातील घडामोडींसंदर्भातला अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचे ठरले. जेव्हा जेव्हा पक्षाने राष्ट्रवादीसोबत आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली, त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे आघाडी सरकारची मोठी बदनामी झाल्याचा मुद्दा या अहवालामध्ये मांडण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...