आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल:तुम्ही विचारता बाबरी पाडताना कुठे होता, मी अभिमानाने सांगतो मी तिथंच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता!

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्राचीच राहणार - देवेंद्र फडणवीस

मी बाबरी पाडली, असे गंभीर वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तुम्ही विचारता बाबरी पाडताना कुठे होता, मी अभिमानाने सांगतो मी तिथेच होतो, शिवसेनेचा एकही नेता नव्हता! असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तर मुंबई महाराष्ट्राची आहे, आणि राहणार त्यामुळे त्यांनी त्यावर भावनिक राजकारण करू नये असे म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला त्यात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांवर गुन्हा दाखल नाही. मी त्यावेळी तिथेच होतो, मात्र तुम्ही कुठे होतात, असा विचारतच भाजपच्या 30 जणांवर गुन्हे दाखल झाले असेही त्यांनी म्हटले आहे. फडणवीस मुंबईतील भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलत होते.

तुम्ही रावणांकडून की रामाच्या बाजुने?

राज्यात हनुमान चालिसा म्हटले तर सरकार उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवसेनेनी एकदा सांगावे की तुम्ही रामाच्रूा बाजुने आहे, की रावणाच्या बाजूने आहे. असा प्रश्न विचारत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही - देवेंद्र फडणवीस

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, ही जीवन पद्धतीने प्रत्येक व्यक्तिला जगण्याचा आधार दिला हे लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

वर्क फॉर्म होम माहिती मात्र वर्क फॉर्म जेल ?

संजय राऊत रोज सकाळी घराबाहेर येतात आणि नौटंकी करतात, रोजगाराचे प्रश्न सोडवायचे असतील तर इफ्तार पार्ट्या झोडून होणार नाही असे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दारूच्या किंमती कमी होऊ शकतात, मात्र पेट्रोलचा दर कमी होऊ शकत नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरें सरकारवर केली आहे. हे सरकार केवेळ दारुड्यासाठी, बिल्डर यांच्या साठी काम करते असेही त्यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांचे वर्क फॉर्म होम माहिती होते, मात्र आता नवाब मलिक यांचे वर्क फॉर्म जेल हे आताच समजले असे म्हणत ठाकरे सरकारवर आरोप केला आहे.

आमच्यावर तुटून पडाल तर तुटाल - फडणवीस

आम्ही इंदिराजींना घाबरलो नाही, तुम्हाला काय घाबणार, आमच्यावर तुटून पडाल तर तुम्ही तुटाल आणि पडाल देखील असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

दरम्यान जेंव्हा देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहतील, तेंव्हा सगळे भोंगे बंद होतील. असे म्हणत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप हिंदुत्ववादी आहे, आणि यानंतर शिवसेनेची हिंदुत्ववाची पडलेली पोकळी मनसेकडून भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत भाजप अनेक नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे.

आशिष शेलार यांची मविआवर टीका

शिवसेनेवर केवळ अधर्म अधर्म राहिला आहे. म्हणून हनुमान चालिसेला विरोध करेल, देवांची मंदिरे तोडेल अशा लोकांच्या सोबतीने महाराष्ट्र राहणार नाही. मुंबईकरांच्या प्रत्येक रुपयांचा हिशोब देणारा काळ आहे. असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तर मुंबई मनपासाठी तयारीला लागा असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सरकार राज्याला मागे नेणारे सरकार - प्रवीण दरेकर

मराठी मानसाच्या हिताचे बोलायचे, आणि इकडे मराठी शाळा बंद पाडायच्या, आणि उर्दु शाळा वाढत आहे. हिंदुत्व हे शिवसेनेसोबत नाही ते आमच्रूासोबत आहे. पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली, आमच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न होत असला तरी, भाजपचा कार्यकर्ता दबणार नाही. आणि मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणारच असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

फडणवीस माजी मुख्यमंत्री नाहीतर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

फडणवीस हे राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. म्हणून काही लोक त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणतात असे म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये घरात काही कार्यक्रम सुरू असताना, मशिदींला त्रास होतो, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर मशिदीवरील भोंगे का काढत नाही, आणि बाबरीचे नाव घेता असा टोला लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...