आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकीचे फोन:ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांना धमकीचे फोन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार तथा मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दोन वेळा जिवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याची खळबळजनक माहिती त्यांनी स्वतःच दिली. ही धमकी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर आल्याचा दावा केला आहे. तसेच कन्नड रक्षण वेदिकेने हे फोन केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ‘माझ्यावर हल्ला झाला तर तो हल्ला माझ्यावर नसून महाराष्ट्रावर हल्ला असेल’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावरून विरोधी पक्षांचे नेते भाजप आणि शिंदे गटावर सतत जोरदार हल्ला करत आहेत. राऊत यांनी पत्रकार परिषदा बंद कराव्यात, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला होता.

बातम्या आणखी आहेत...