आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त प्रतिक्रिया:खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्यानंतर नाना पटोले म्हणतात - तिरस्काराच्या मानसिकतेतूनच नाव बदलले, या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराचे नाव बदलण्याची कृती द्वेषातून

मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधून निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर संतप्त होत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तिरस्काराच्या मानसिकतेतूनच नाव बदलण्यात आले आहे. या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केलेला आहे. त्यांनी या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकारकडून केली जात असल्याचा आरोपही पटोलेंनी केला.

'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराचे नाव बदलण्याची कृती द्वेषातून
देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. तसेच पुढे ते म्हणाले की, अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते. जर राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल, तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? असा सवालही पटोलेंनी विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले...
पुरस्काराचे नाव बदलण्याविषयी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत तसेच ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने पुरस्काराला त्यांचे नाव दिलेय. पण वारंवार एखाद्या योजनेची नावे बदलणे आणि त्यातून काय मिळवायचेआहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी केली जाऊ नये. असे राऊत म्हणाले.

दिग्विजय सिंह म्हणाले...
पुरस्काराचे नाव बदलल्यावरुन दिग्विजय सिंह म्हणाले की, 'मला तर असे वाटले होते की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठोवले जाईल. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!' असे दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला मेगलोमॅनिया म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...