आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:आघाडी सरकार जातेय की राहतेय गौण; विरोधकांनी सक्षमपणे काम करावे : पंकजांचा पुन्हा घरचा आहेर!

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चालते की पडते, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. विरोधकांनी जनतेसाठी काम करणे महत्त्वाचे, असा सल्ला देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला रविवारी घरचा आहेर दिला.

पंकजा रविवारी सकाळी मुंबईत बोलत होत्या. दिल्ली दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, पक्षाच्या सचिवांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. त्यासाठी आपण दिल्लीला चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले. सरकार पडणार आहे, असे सारखे आम्ही विरोधक म्हणू लागलो तर कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जाईल. कार्यकर्ते सक्रिय राहणार नाहीत. तसेच विरोधक म्हणून आमचे काम सक्षमपणे चालले आहे, असे त्यांनी सांगितले. पंकजा बीडच्या पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही, असा आरोप आहे. यावर हे जनताच ठरवेल असे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...