आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मोठी दुर्घटना:कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये LPG टँकमध्ये झाली गळती, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या; रुग्णांना हलवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकमध्ये अशा प्रकारेच ऑक्सिजन लीक झाल्याची घटना घडली होती.

शनिवारी मुंबईच्या सरकारी कस्तूरबा रुग्णालयाच्या LPG गॅस टँकमध्ये गळती झाली. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या 9 गाड्या पोहोचल्या आहेत आणि गळती रोखण्याचे काम जारी आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितरित्या हलवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत 58 रुग्णांना रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. ज्यामधून 20 रुग्ण कोरोनाचे आहेत आणि सर्वांची तब्येत स्थिर आहे.

या दरम्यान या घटनेची सूचना मिळताच महापौर किशोरी पेडनेकर घटनास्थळी पोहोचल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत एका कार्यक्रमात सामिल झालेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये अशा प्रकारेच ऑक्सिजन लीक झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 22 रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...