आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लर्न फ्रॉम होम : बारावीचा अभ्यासक्रम बालभारती संकेतस्थळावर

मुंबई2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक

बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरूपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई-साहित्य बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत देखील पडताळणी सुरू आहे. ऑनलाइन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी, हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे

युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी), महाराष्ट्रीय प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी (इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दू (उर्दू), युवकभारती– सिंधी (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती - तेलुगू (तेलुगू), शिक्षणशास्त्र (मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दू), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दू), तर्कशास्त्र (इंग्रजी), बालविकास (इंग्रजी), भौतिकशास्त्र (इंग्रजी), रसायनशास्त्र (इंग्रजी), जीवशास्त्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग २) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग २) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी/इंग्रजी), अर्थशास्त्र (मराठी/इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी/ इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्त्र (मराठी/इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान–विज्ञान (इंग्रजी).

बातम्या आणखी आहेत...