आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणुक:विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. प्रज्ञा सातव यांचा अर्ज दाखल, महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्षा डॉ. प्रज्ञा सातव यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता विधान भवनात निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती. विधान परिषदेचे आमदार शरण रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून डॉ. सातव यांची उमेदवारी पक्षाने जाहिर केली होती. त्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नगरसेवक अनिल नेनवाणी, विलास गोरे, बापुराव घोंगडे यांच्यासह हिंगोली जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, सदर निवडणुकीत भाजपा कडून संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र सदर निवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतून प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भातील सुतोवाचही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...