आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Legislative Council | Matoshri's Doors Finally Opened Congress Leaders' Discussion Is Positive; With The Consent Of The Office Bearers, They Started Protesting Later

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजी-नाराजी:अखेर ‘मातोश्री'चे दरवाजे उघडले काँग्रेस नेत्यांची चर्चा सकारात्मक; आधी संमती देऊन पदाधिकाऱ्यांनी नंतर विरोध सुरू केल्याने स्वाभिमानीत फूट

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभाजन करू नका; काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना गळ

गेला आठवडाभर गाजत असलेल्या काँग्रेसच्या नाराजी नाट्यामागचे आणखी एक नवे कारण गुरुवारी समोर आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभाजन करण्याचा घाट शिवसेनेने घातला असल्याने या महत्त्वाच्या खात्याचे विभाजन करू नये, अशी गळ काँग्रेस नेत्यांनी गुरुवारच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. त्यासोबतच ‘न्याय’सारखी योजना राज्यात आणावी, विधान परिषदेवर समान जागावाटप व्हावे, वंचित घटकाला आर्थिक पॅकेज द्यावे या मागण्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

‘मातोश्री’ निवासस्थानी दुपारी ही बहुचर्चित बैठक झाली. काँग्रेसकडून महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, तर शिवसेनेकडून अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. गेला आठवडाभर या बैठकीची चर्चा होती

राज्यपाल नियुक्तीत जागावाटप समान हवे

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ‘न्याय’सारखी योजना राज्यात लागू करावी, लाॅकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या वंचित घटकांना पॅकेज द्यावे, या मागण्या काँग्रेसने आज मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या.

अधिकाऱ्यांबाबत चर्चा नाही : मुख्य सचिव अजोय मेहतांमुळे नाराजी असल्याचे सांगितले जात होते, परंतु बैठकीत कोणत्याही अधिकाऱ्याच्या संदर्भात चर्चा झाली नाही, असे थोरात यांनी सांगितले.

विकास निधीचे वाटप समान असावे

‘विकास निधीच्या वाटपाचा विषय बैठकीत निघाला. या निधीचे समान वाटप असावे, असे मुख्यमंत्र्यांच्या कानी घातले आहे. आमची कोणतीही नाराजी नव्हती. - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष

१ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाजनाचा प्रस्ताव फडणवीस सरकारच्या काळात तयार झालेला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत.

२ राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेना ५, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेसला ३ जागा मिळणार आहेत. तसे झाल्यास थोरात यांची गोची होऊ शकते. त्यामुळे ते समान जागांसाठी आग्रही आहेत.

बातम्या आणखी आहेत...