आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:कोरोनामुळे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन रद्द होण्याची शक्यता; ... तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या स्थळावरून मतभेद होऊ शकतात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिवाळी अधिवेशन रद्द केल्यास 7 फेब्रुवारी 2021 पूर्वी अधिवेशन घेणे क्रमप्राप्त आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्याने राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रद्द हाेण्याची शक्यता असून थेट आता पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे. १० नोव्हेंबरला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय झाला होता. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या अधिवेशनाचा कालावधी कमी केला होता. पुढील बैठक २ डिसेंबरला होणार आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबरला झाले. २ अधिवेशनातील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन रद्द केल्यास ७ फेब्रुवारी २०२१ पूर्वी अधिवेशन घेणे क्रमप्राप्त आहे. परिणामी २० जानेवारी ते ५ फेब्रुवारीच्या दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संकेत आहेत.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यास मान्यता देण्यापूर्वी विदर्भातील मंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची अट टाकली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या स्थळावरून मतभेद होऊ शकतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser