आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:कुटुंबीयांना वरवरा राव यांची भेट घेऊ द्या : कोर्ट, एनआयए आणि महाराष्ट्र सरकारला दिले निर्देश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राव यांना कोरोनाची लागण झाली असून ते नानावटी रुग्णालयात मृत्युशय्येवर आहेत'

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेतील कवी वरवरा राव यांची कुटंुबीयांना भेट घेऊ देण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने दिली आहे. सोमवारी या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, राव यांना कोरोनाची लागण झाली असून ते नानावटी रुग्णालयात मृत्युशय्येवर आहेत. आपला मृत्यू कुटुंबीयांच्या समोरच व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी रागात आपले डोके बेडवर आदळले होते. यामुळे ते जखमी झाले होते.

यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या पीठाने राव यांच्या प्रकृतीबाबत बुधवारपर्यंत कोर्टाला माहिती द्यावी, असे निर्देश एनआयए व राज्य सरकारला दिले. तसेच कुटुंबीयांना राव यांची भेट घेण्याचीही परवानगी देण्याचे निर्देश दिले. कोर्ट म्हणाले, राव यांची प्रकृती खरेच अत्यंत गंभीर असेल व ते शेवटच्या घटका मोजत असतील तर त्यांना रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यावे.