आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाच घेताना रंगेहाथ पकडले तरी संबंधित कर्मचाऱ्याला न्यायालयाने दोषी ठरवल्यावरच त्याचे नाव व छायाचित्र प्रसिध्द करावे, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी (ता.६) पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लाचलुचपत व इतर गुन्ह्यांतर्गत कारवाईनंतर, संबंधित विभागाकडून त्या संशयिताचे नाव व छायाचित्र वृत्त माध्यमांमध्ये प्रसिध्द करून माहिती दिली जाते.
आजपर्यंतच्या अशा प्रकरणी न्यायालयीन निवाड्यांचा अभ्यास केला असता, अशा कारवायांमध्ये अटक केलेले सर्वच संशयित हे दोषी नसतात, असे आढळून आलेले आहे. कालांतराने कर्मचारी न्यायालयात निर्दोष सुटतात, मात्र कारवाई व न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वृत्तमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांमुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला नाहक बदनामीचा व सामाजिक रोषाचा सामना करावा लागतो, असे अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.