आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:गांधीजींवर पत्रलेखन; राज्यपालांना पहिले पारितोषिक, 80 हजार स्पर्धकांचा सहभाग

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक

महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

“प्रिय बापू आप अमर हैं” या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा व “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली. स्पर्धेत ८०,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाक सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय डाक विभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते, त्या वेळी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डाक विभागाचे कौतुक करताना या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होऊ, असे राज्यपालांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लेखन करून स्पर्धेत पाठवला होता. दरम्यान, मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक पी. सी.जगताप व सहायक अधीक्षक एस. डी. खरात यांनी सोमवारी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना प्रथम पुरस्काराचा २५००० रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला.

0