आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लिफ्ट कोसळली:अंधेरीत 15 मजली इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 4 जण गंभीर जखमी; लहान मुलांचाही समावेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या अंधेरी येथील एका रहिवासी भागात लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. 15 मजली असलेल्या या इमारतीमध्ये 10 व्या मजल्यावरून अचानलक लिफ्ट कोसळली. या घटनेत 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अंधेरीतील महाकाली सोसायटीत असलेल्या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टमध्ये 4 ते 5 जण होते ते सगळेच गंभीर जखमी झाले आहेत. केबल तुटल्याने ही लिफ्ट अचानक कोसळली असावी असा अंदाज आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली. यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आले. सर्व जखमींना जवळच्याच आदित्य नर्सिंग होम या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये एक महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...