आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारूची मागणी:राज्यात दारूची ऑनलाइन डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर 12 तासांत 5434 ऑर्डर प्राप्त झाल्या, नागपूर आणि लातूनमधून सर्वाधिक मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
15 मेपासून राज्यात दारूची ऑनलाइन विक्रीला सुरुवात झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. - Divya Marathi
15 मेपासून राज्यात दारूची ऑनलाइन विक्रीला सुरुवात झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाने याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
  • ऑनलाइन डिलिव्हरीसाठी नागपूर आणि लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक 88% ऑर्डर मिळाल्या

15 मेपासून राज्यभर दारूची ऑनलाईन होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, केवळ 12 तासांत 5,434 ऑर्डर ऑनलाईन घेण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक 88 टक्के ऑर्डर नागपूर आणि लातूर जिल्ह्यातून आल्या होत्या. 

किरकोळ विक्रीमुळे ऑनलाइन ऑर्डर कमी झाल्या

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतिलाल उमाप यांनी सांगितले की, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 26 मध्ये दारूची किरकोळ विक्री सुरू आहे. यामुळे ऑनलाइन ऑर्डरमध्ये घसरण दिसून आली. तर नागपुरात 2,700 आणि लातूरमध्ये 2,100 ऑर्डर घेण्यात आल्या. यातील सुमारे 95 टक्के ऑर्डर कठोर दारू खरेदीसाठी होती.

राज्यात सध्या 5 हजार दारूची दुकाने उघडली आहेत

उत्पादन शुल्क विभागाला आशा आहे की लवकरच मुंबईतील दारूची दुकानेही विक्रीसाठी खुली होतील. आकडेवारीनुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यात 4,935 दारूची दुकाने उघडली आहेत. यापैकी 530 दारुची दुकाने, 2129 बिअर शॉप्स आणि 1,938 देशी दारूची दुकाने आहेत.

ई-टोकनद्वारे खरेदी करू शकता दारू

कोरोना संसर्गाच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने एक मार्गदर्शक सूचना जारी करत म्हटले की, दारुच्या दुकानांवरील गर्दी कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन टोकन व्यवस्थेची सुरुवात केली आहे. नवी प्रणाली अंतर्गत राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाइटवर लोक स्वतः नोंदणी केल्यानंतर टोकन प्राप्त करून दारु खरेदीसाठी दुकानावर जाऊ शकतील. ही यंत्रणा पुण्यात सुरू होणार आहे. येथे यशस्वी झाल्यास राज्याच्या विविध भागात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.  

दारुच्या होम डिलिव्हरीबाबत आहेत हे नवीन नियम

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार, बॉम्बे लिकर नियमांतर्गत FL-II, FL/BR-II, FL/W-II परवानाधारकांना दारू, बियर, माइल्ड लिकर, वाइन यांची घरपोच डिलेव्हरी करता येते. अधिसूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत सरकार याप्रकरणी पुढील आदेश देईपर्यंत दारुची होम डिलिव्हरी सुरू राहील.

> केवळ परवानाधारक दुकानांनाच दारुची होम डिलिव्हरी करता येईल. 

> जो माणूस दारू पोचविण्यासाठी जातो त्याला मास्क आणि ग्लव्स घालणे आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. 

> सरकारचा हा आदेश लॉकडाऊन मुदतीपर्यंत राहील.

बातम्या आणखी आहेत...