आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुधारित आदेश:घरपोच मद्यविक्री आता उद्यापासून, डिलिव्हरी बॉयची तपासणी होणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मद्य विक्रेत्यास दहा डिलिव्हरी बॉयचे बंधन, मद्यविक्रीचे सुधारित आदेश जारी

घरपोच मद्य मिळवण्यासाठी आता आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिलिव्हरी बॉयच्या वैद्यकीय तपासणी आणि ओळखपत्र आदी प्राथमिक तयारीसाठी एक दिवस मागून घेतल्याने उत्पादन शुल्क विभागाने आता गुरुवार १४ मे ऐवजी १५ मे पासून घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेतला असून तसा सुधारित आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जारी केला आहे.

घरपोच मद्यसेवा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १३९ अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश ११ मे रोजी काढला होता. सदर आदेशाच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाई बाबत सर्वसाधारण सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांना आयुक्तांचे पत्र १२ मे रोजी देऊन आदेशाची अंमलबजावणी गुरुवार १४ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा वेळ मागून घेतल्याची माहिती देऊन उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी सांगितले, क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलीव्हरी बॉय मिळवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारी साठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याचे सांगितले, त्यानुसार एक दिवस वाढवून आता ही सुविधा १५ मे सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध केली जाणार आहे. या संपूर्ण आदेशातील नियम-अटींबाबतचा एक आदेशही राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी जारी केला.

राज्यामध्ये घरपोच मद्यसेवा कंटेनमेंट झोन वगळून दिली जाणार असून ही किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती प्रकार म्हणजेच एफएल-II. एफएल/बीआर-II व एफएल/डब्ल्यु-I मधून विक्रीसाठी असलेल्या उक्त नमूद मद्य प्रकारासाठीच राहील. तथापि, देशी मद्याची घरपोच मद्य सेवा देता येणार नाही. घरपोच मद्य देताना एमआरपीनुसारच मद्य विक्री करावी. ज्या ग्राहकांकडे मद्य परवाना नसेल त्यांनी https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करावयाचे असून येथे तात्काळ परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मद्य विक्रेत्यास दहा डिलिव्हरी बॉयचे बंधन

मद्य विक्रेत्याने वितरण व्यवस्थेसाठी १० पेक्षा जास्त लोकांची नियुक्ती करू नये आणि या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत २४ युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतुक करणार नाहीत असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जे डिलीव्हरी बॉय नोकरी सोडून जातील अथवा त्यांना कामावरुन कोणत्याही कारणास्तव कमी करण्यात येईल त्यांचे ओळखपत्र न चुकता सबंधित कार्यक्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे जमा करावे असेही आदेशात स्पष्ट केले आहे.    

बातम्या आणखी आहेत...