आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शिवसेना प्रवक्ते:शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर; मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत, यांच्यासह 11 जणांची निवड

मुंबई15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

शिवसेनेच्या प्रवक्तयांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना भाजपला सडेतोड उत्तर देणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते असणार आहेत. यांच्यासह दहा जणांची यादी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ही नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामध्ये प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यत आली. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यादीत आहेत या अकरा जणांची नावे

 1. संजय राऊत : राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
 2. अरविंद सावंत : खासदार
 3. धैर्यशील माने : खासदार
 4. प्रियंका चतुर्वेदी : राज्यसभा खासदार
 5. डॉ. नीलम गोऱ्हे : विधानपरिषद आमदार
 6. गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा मंत्री
 7. अ‍ॅड. अनिल परब : परिवहन मंत्री
 8. उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
 9. सुनील प्रभू : आमदार
 10. प्रताप सरनाईक : आमदार
 11. किशोरी पेडणेकर : महापौर
0