आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिखर धवनच्या (६२) नाबाद अर्धशतक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या (१० चेंडूंत नाबाद ३० धावा) झंझावाती खेळीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने आयपीएलच्या प्लेऑफ प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. मयंक अग्रवालच्या पंजाब संघाने मंगळवारी लीगमधील आपल्या दहाव्या सामन्यामध्ये गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. पंजाब संघाने १६ षटकांत आठ गड्यांनी धडाकेबाज विजयाची नोंद केली.
सुदर्शनच्या (६५) शानदार खेळीतून गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४३ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये पंजाब संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात २४ चेंडूं राखून झटपट विजयश्री खेचून आणली. विजयासाठी भानुका राजपक्षेने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे पंजाब संघाला स्पर्धेत पाचवा विजय साजरा करता आला. दरम्यान, गुजरात संघाला सुमार फलंदाजीपाठाेपाठ गोलंदाजीचा माेठा फटका बसला. पंजाबकडून रबाडाने चार बळी घेतले.
लिव्हिंगस्टोनची तुफानी खेळी पंजाब संघाच्या विजयासाठी लियाम लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने शमीने टाकलेल्या १६ व्या षटकांत सहा चेंडूंमध्ये २८ धावा काढल्या. त्याने सलग पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूंवर षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पाचव्या चेंडूवर पळून दोन धावा काढल्या. त्यानंतर शेवटच्या सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यासह त्याने सहा चेंडूंमध्ये २८ धावा चोपल्या. त्याने सामन्यामध्ये १० चेंडूंमध्ये नाबाद ३० धावा काढून आपल्या पंजाब संघाचा झटपट विजय निश्चित केला.
धावफलक, नाणेफेक गुजरात (फलंदाजी)
गुजरात टायटन्स धावा चेंडू ४ ६
वृद्धिमान झे.मयंक गो. रबाडा २१ १७ ०३ १
शुभमान गिल धावबाद (ऋषी) ०९ ०६ ०२ ०
साई सुदर्शन नाबाद ६५ ५० ०५ १
हार्दिक झे.जितेश गो. ऋषी ०१ ०७ ०० ०
मिलर झे. रबाडा गो. लिव्हिंगस्टोन ११ १४ ०० ०
तेवाटिया झे. संदीप गो. रबाडा ११ १३ ०० ०
राशिद झे. जितेश गो. रबाडा ०० ०१ ०० ०
प्रदीप संगवान त्रि.गो. अर्शदीप ०२ ०५ ०० ०
फर्ग्युसन झे.लिव्हिंगस्टोन गो. रबाडा ०५ ०३ ०१ ०
अल्झारी जाेसेफ नाबाद ०४ ०५ ०० ०
अवांतर : १४, एकूण : २० षटकांत ८ बाद १४३ धावा. गडी बाद क्रम : १-१७, २-३४, ३-४४, ४-६७, ५-११२, ६-११२, ७-१२२, ८-१२९ गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-१७-०, कागिसो रबाडा ४-०-३३-४, अर्शदीप सिंग ४-०-३६-१, ऋषी धवन ४-०-२६-१, लियाम लिव्हिंगस्टोन २.३-०-१५-१, राहुल चहर १.३-०-११-०.
पंजाब किंग्ज धावा चेंडू ४ ६
जाॅनी बेअरस्टो झे.संगवान गो. शमी ०१ ०६ ०० ०
शिखर धवन नाबाद ६२ ५३ ०८ १
भानुका पायचीत गो. फर्ग्युसन ४० २८ ०५ १
लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद ३० १० ०२ ३
अवांतर : १२, एकूण : १६ षटकांत २ बाद १४५ धावा. गडी बाद क्रम : १-१० ,२-९७ गोलंदाजी : मो. शमी ४-०-४३-१, प्रदीप २-०-२३-०, जाेसेफ ३-०-२५-०, लुकी फर्ग्युसन ३-०-२९-१, राशिद खान ४-०-२१-०,
सामनावीर रबाडाचे ४ बळी : पंजाब संघाकडून कागिसो रबाडाने गोलंदाजीतील आपला दबदबा कायम ठेवला. त्याने चार षटकांत ३३ धावा देताना चार बळी घेतले. तसेच अर्शदीप, ऋषी व लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी एक बळी घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.