आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा:निवडणूक आयाेगाच्या निर्देशांनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महानगरपालिका, नगर परिषद व औद्योगिक नागरी सुधारणा विधेयक मंजूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक आयाेगाने निर्देश दिल्यानंतर लगेच घेतल्या जातील, विनाकारण पुढे ढकलणार नाही, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद, नगरपंचायती व आैद्याेगिक नागरी सुधारणा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर झाले.

विधानसभेत काही दुरुस्ती विधेयके मंजूर करण्यात आली. त्यात महाराष्ट्र काैशल्य विकास विद्यापीठ, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती सुधारणा विधेयक २०२१ मंजुरीसाठी सभागृहापुढे आले हाेते. त्यावर झालेल्या चर्चेत विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दुरुस्ती विधेयकातून राज्य सरकार अमर्याद अधिकार आपल्या हातात घेत आहे. कधीही निवडणुका स्थगित केल्या जातील. यातून सत्ता मिळवण्यासाठी दबावतंत्रासाठी कायद्याचा वापर हाेऊ शकताे. अनेक महापालिकांना सभा घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही. मुंबई महापालिका ऑनलाइन घ्यायला सांगितले जाते. नियम वाटेल तसे केले जाऊ शकतात. अनेक राज्यांत निवडणुका झाल्या. असे असताना महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलण्याचा अमर्याद अधिकार सरकार घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. लाेकप्रतिनिधींवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून या दुरुस्ती विधेयकाला विराेध केला.

३१ जुलैपर्यंत निवडणुका पुढे ढकला : देवेंद्र फडणवीस
काेराेनामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न हाेत आहे. खरे तर आता लसीकरण सुरू आहे. ३१ जुलैपर्यंत ते पूर्ण हाेईल, ताेपर्यंत पुढे ढकलणे ठीक आहे. तसे झाले नाही तर या नियमाचा गैरफायदा घेतला जाईल. ते लोकशाहीला घातक असेल, असे फडणवीस म्हणाले. तर आशिष शेलार यांनी हे विधेयक मागे घ्या, अशी मागणी केली. त्यावर शिंदे यांनी सरकार कायद्याचा अमर्याद वापर करणार नाही, असे आश्वासन सभागृहाला दिले.

बातम्या आणखी आहेत...