आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्णयात बदल:क्वॉरंटाइनसाठी वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्यास स्थानिकांचा विरोध

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्चभ्रू वसाहतीतील रहिवाशांसमोर शिवसेनेने गुडघे टेकले

मरीन ड्राइव्ह येथील प्रख्यात वानखेडे स्टेडियम क्वॉरंटाइन रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. मात्र, स्टेडियमच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी त्याला विरोध केला. परिणामी शिवसेनेने या निर्णयात बदल केला आहे. परंतु, उच्चभ्रूंच्या विरोधासमोर सेनेने गुडघे टेकल्याचा सूर मुंबईत उमटत आहे.

वानखेडेसारखे मैदान क्वॉरंटाइनसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तसे पत्र पालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पाठवले होते. रविवारी सकाळी सेनेचे खासदार संंजय राऊत यांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आणि वानखेडेशेजारी असलेले ब्रेबॉर्न स्टेडियमही कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात यावे, अशी सूचना केली.

पावसाळा तोंडावर असताना खेळाचे मैदान वापरणे योग्य ठरणार नाही. मैदानात िचखल होईल, असे सेना नेते आदित्य ठाकरे यांनीच राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यावर राऊत यांनी सायंकाळी पुन्हा ट्विट करत खेळाची मैदाने वाचवायला हवीत, अशी सारवासारव केली आणि आदित्य यांच्या ट्विटचे समर्थन केले.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची वानखेडे स्टेडियम इथे व्यवस्था करता येईल का, याची पाहणी महापौरांनी नुकतीच केली होती, तर वानखेडेचा निर्णय पालिकेने आठवड्यापूर्वी रद्द केला आहे, असे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

पालिका आता स्टेडियममधील पार्किंग आणि इतर खोल्या वापरता येतील का, याचा अभ्यास करत आहे. वानखेडे आणि ब्रेबाॅर्न स्टेडियम ही मैदाने मरीन ड्राइव्हशेजारी आहेत. हा परिसर मुंबईत उच्चभ्रूंचा समजला जातो. उच्चभ्रू स्थानिकांच्या विरोधाला घाबरून शिवसेनेने निर्णय बदलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप नेते राज पुरोहित यांचा विरोध

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर कोविड सेंटर उभारण्याला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात पुरोहित यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये काही कंपन्यांची कार्यालये आहेत, शिवाय हा परिसर रहिवासीदेखील आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती पुरोहित यांनी व्यक्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...