आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल सेवा:आजपासून सर्वसामान्य महिलांसाठी लोकल प्रवास सुरू, मात्र वेळेच्या मर्यादांमुळे फायदा होणार का? महिलांचा सवाल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सर्वच महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नवरात्रीदरम्यान मुंबईतील महिलांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. आजपासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून सकाळी 11 वाजेपासून मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये महिलांना प्रवास करता येणार आहे. परंतू, महिलांना सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्रीपर्यंत प्रवास करता येईल. मात्र आता या वेळेच्या मर्यादांचा फायदा कुणाला होणार असा सवाल महिलांनी विचारला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सर्वच महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून सर्वसामान्य महिला लोकल प्रवास करु शकतील. मात्र सरकारच्या वतीने महिलांना प्रवासासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि रात्री 7 वाजेनंतर लोकल बंद होण्यापर्यंत प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यावर अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वेळेच्या मर्यादेचा फायदा कुणाला होणार असा सवाल त्यांनी विचारला आहे.

सामान्यतः मुंबईतील चाकरमानी महिलांना सकाळी 10 वाजता कामावर हजर राहावे लागले. दरम्यान या महिलांना सकाळी किमान 8 वाजता घरातून निघावे लागते. असे असताना मुंबई लोकलची 11ची वेळ काय कामाची असा सवाल महिलावर्गाकडून विचारला जात आहे. यासोबतच सरकारला जर सर्वच महिलांसाठी लोकल सुरु करायची असेल तर घालून दिलेली वेळेची मर्यादा बदलण्यात यावी अशी मागणीही महिलांकडून केली जात आहे.

पियूष गोयल यांनी ट्विट करत दिली होती माहिती
सब-अर्बन ट्रेन्समध्ये महिलांना प्रवास करता येईल, ही माहिती स्वतः रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. गोयल म्हणाले,'आम्ही आधीपासूनच यासाठी तयार होतो. महाराष्ट्र सरकारकडून पत्र मिळाल्यानंरच आम्ही महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.' मुंबईत एसी लोकल सर्विसेदेखील सुरू झाली आहे. तर, मोनोरेल सेवा 18 ऑक्टोबर आणि मेट्रो 19 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या.

बातम्या आणखी आहेत...