आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात मिशन बिगेन अंतर्गत सर्व सेवा हळुहळू पूर्वपदावर सुरू करण्यात येत आहेत. राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच अनलॉकनंतरही सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल पुढील महिन्यात सुरू करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखतीत मंगळवारी दिली. मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कमर्शियल भागातील कार्यालये चोवीस तास सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनामुळे सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकने प्रवास करण्याची परवानगी आहे. परिणामी इतर कर्मचाऱ्यांना बस किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. त्यात त्यांचा कित्येक वेळ वाया जातो. त्यामुळे लोकल सेवा सर्वांसाठी पूर्ववत सुरू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून 15 ऑक्टोबर पर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लोकल सेवेबरोबर इतर काही सुविधा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. एकदा सुरू केलेल्या सेवा पुन्हा बंद करण्याचा आमचा विचार नाही. यामुळे आम्ही अनेक गोष्टी वेळ घेऊन विचारपूर्वक सुरू करत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.