आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:'शिस्त, सूचना पाळल्या तरच लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही' : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आगामी काळात पोलिसांकडूनही कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे

नागरिकांनी शिस्तीचे आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तरच ३० एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवता येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा शनिवारीच केली आहे. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्याच्या काही भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक अाहे. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही, याचे भान ठेवून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात असल्याचे म्हटले होते. विषाणूंची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असेही त्यांनी म्हटले होते. यासाठी आगामी काळात पोलिसांकडूनही कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अजिबात गय करू नका, असे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...